लक्झरी बस-दुचाकीत भीषण अपघातात २० ठार

कर्नूल : हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक मोठी आणि मन हेलावून टाकणारी दुुर्घटना घडली. ‘कावेरी ट्रॅव्हल्स’च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. दुचाकीच्या धडकेमुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण बसमध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही.

बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मुख्यमंत्री नायडूंकडून दु:ख व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत असे त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news