33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यात २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

धुळ्यात २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

धुळे : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी भगर खाल्ल्याने ५०० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बुलडाण्यातील घटना ताजी असतानाच धुळ्यात १५० ते २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या ६३० प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलिस जवान हजर झाले. मात्र, जवानांचा रोल कॉल सुरू होताच अनेक जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला.

अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जास्त त्रास होत असल्याने जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जवानांना मेसच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. त्यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR