28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाअफगाणिस्तानच्या २४४ धावा

अफगाणिस्तानच्या २४४ धावा

अहमदाबाद : अफगाणिस्तानचे वन डे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. अझमतुल्लाह ओमरझाईने (नाबाद ९७) उल्लेखनीय फलंदाजी करून आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. पण, अफगाणिस्तानला आज उपान्त्य फेरीचे गणित सोडवण्यात अपयश आले अन् न्यूझिलंडचे चौथे स्थान अधिक मजबूत झाले. अफगाणिस्तानचे ६ फलंदाज ११६ धावांत माघारी परतले होते, परंतु त्यांच्या शेवटच्या फळीने १००पेक्षा अधिक धावा जोडल्या. वर्ल्डकप स्पर्धेत प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने सहा विकेट्स गमावूनही शेवटच्या फळीसह आफ्रिकेविरुद्ध २४४ धावा काढल्या.

अफगाणिस्तानने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ८ सामन्यांत त्यांनी ४ विजय मिळवून स्वत:ला उपान्त्य फेरीच्या शर्यतीत कायम ठेवले, परंतु नेट रन रेटमध्ये त्यांनी मार खाल्ला. रहमनुल्लाह गुरबाज (२५) व इब्राहिम झद्रान (१५) यांनी मोठी खेळी केली नसली तरी त्यांनी सहका-यांसाठी एक वातावरण तयार करून दिले. रहमत शाह (२६) याच्या विकेटने आफ्रिकेने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (२), इक्रम अलिखिल (१२) व मोहम्मद नबी (२) हे अपयशी ठरले. अफगाणिस्तानच्या पहिल्या सहा विकेट्समध्ये लुंगी एनगिडी व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

अझमतुल्लाह ओमरझाई आणि राशीद खान यांनी सातव्या विकेटसाठी चांगली खेळी केली. अझमतुल्लाहने या वर्ल्ड कपमधील त्याचे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. राशीद व ओमरझाई यांची ४४ धावांची भागीदारी अँडिले फेहलुक्वायोने तोडली, राशीद १४ धावांवर झेलबाद झाला. नूर अहमद ( २६) आणि अझमतुल्लाह यांनी ४४ धावांची भागीदारी केली. मुजीब उर रहमान (८) बाद झाल्यानंतरही अझमतुल्लाहने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. अफगाणिस्तानने ५० षटकांत २४४ धावा उभ्या केल्या. अझमतुल्लाह १०७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला. ५०व्या षटकात शतकासाठी त्याला ४ धावा हव्या होत्या, परंतु कागिसो रबाडाने त्याला त्या करू दिल्या नाहीत.

क्विंटन डी कॉकचे रेकॉर्ड
क्विंटन डी कॉकने आजच्या सामन्यात यष्टीमागे ६ झेल पकडले आणि वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात ६ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणारा तो तिसरा यष्टिरक्षक ठरला. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (वि. नामिबिया, २००३) आणि सर्फराज अहमद (वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) यांनी अशी कामगिरी केली आहे. वर्ल्डकप इतिहासात एकाच सामन्यात ५ झेल घेणारा तो सातवा यष्टिरक्षक ठरला. गिलख्रिस्ट, सर्फराज, रिडली जेकब्स, सय्यद किरमानी, टॉम लॅथम व उमर अकमल यांनी ही कामगिरी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR