28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीय२६/११ हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर विषप्रयोग

२६/११ हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर विषप्रयोग

इस्लामाबाद : मुंबई २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असणा-या साजिद मिर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील जेलमध्ये विषप्रयोग करण्यात आला आहे. डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. दहशतवादी साजिद मिर हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड होता.

काही महिन्यांपूर्वी साजिद मिरला लाहोर सेंट्रल जेलमधून डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला एअरलिफ्ट करून सीएमएच बहावलपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तो व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला असून यादरम्यान त्यांना ऑक्टोबर २०२३ पासून सेंट्रल जेल डेरा गाझी खानच्या स्वयंपाकघरात काम करणारा एक खासगी स्वयंपाकी बेपत्ता असल्याचे समजले. पाकिस्तानी एजन्सी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

साजिद दहशतवादी हल्ल्यातील आरोपी
साजिद मिर हा दहशवादी मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील एक आरोपी आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेचा तो भाग आहे. या दहशवादी संघटनांनी २००८ साली हा दहशवादी कट मुंबईत रचला होता. त्यावेळी त्यांनी कामा रुग्णालय, कॅफे, रेल्वे स्थानक यांसारख्या अनेक जागांवर हल्ला केला होता. यामध्ये १७० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR