28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रचित्रपटगृहात फटाके फोडणाऱ्या ३ जणांना अटक

चित्रपटगृहात फटाके फोडणाऱ्या ३ जणांना अटक

नाशिक : दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर-३ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे पडद्यावर आगमन होताच चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजी केली. अचानक फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरून पळापळ झाली.

या घटनेनंतर पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला. चित्रपटगृह मालकाने त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील तीन आरोपीना छावणी पोलिसांनी अटक केली असून रविवारी त्या आरोपींना तपास व चौकशी कामी मोहन चित्रपट गृहात नेण्यात आले होते. टायगर ३ हा सिनेमा सुरू असताना काही जणांनी फटाके फोडल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगाव मधील मोहन चित्रपटगृहात घडला होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR