परभणी : सर्वात्मक ॐ गुरूदेव परिवाराचे प.पू. वचन माऊली यांच्या संकल्पनेतून यज्ञ समिती परभणीच्या वतीने टाकळी कुंभकर्ण येथे दि. २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३१०५ कुंड गायत्री महायज्ञ सोहळ्याचे भुमिपूजन दि.२ नोव्हेंबर रोजी श्री १००८ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यशवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेदशास्त्र संपन्न ह.भ.प. बाळू गुरू असोलेकर, ह.भ.प. प्रभाकर नित्रुडकर गुरू, ह.भ.प. शंकर आजेगावकर, संजय टाकळीकर गुरू यांच्यासह टाकळी कुंभकर्ण व पं्रक्रोशीतील गावक-यांच्या उपस्थितीत पार पडला.
टाकळी कुंभकर्ण येथे सर्वात्मक ॐ गुरूदेव परीवाराच्या वतीने नियोजित आश्रमाच्या जागेत दि.२२ डिसेंबरला हा गायत्री महायज्ञ सोहळा होणार आहे. या ठिकाणच्या ४ एकर जागेमध्ये सर्वात्मक गुरूदेव आश्रम उभारण्यात येणार आहे. या निमित्त २१ डिसेंबरला परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. दि. २२ डिसेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत महायज्ञ सोहळा होणार आहे. यज्ञासाठी नोंदणी समिती, कार्यकारी समिती, सल्लागार समिती निश्चित केली जाणार आहे.
गणपती चौकात यज्ञ समितीचे संपर्क कार्यालय असार आहे. महायज्ञामध्ये १२ हजार ४२० भाविक जोडपे सहीागी व्हावे असा संयोजन समितीचा मानस आहे. यज्ञात सहभागी होण्याकरीता माफक नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. महायज्ञानंतर दुपारी १२ ते २ साधू, संताचे प्रवचन होईल. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.
या गायत्री महायज्ञ भूमिपूजन सोहळ्यास माजी खा. ऍड. तुकारामजी रेंगे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, ऍड. न. चि. जाधव, कर सल्लागार राजकुमार भांबरे, भागवतराव खोडके, रमेशराव दुधाटे गोळेगावकर, बंडू नाना सराफ, ह.भ.प. बाळासाहेब मोहिते, भगीरथ बद्दर, पांडूसेठ वट्टमवार, बाळासाहेब चौधरी, दत्तराव दैठणकर, ऍड. किरण दैठणकर, प्रभाकरराव देशमुख, विजयराव कान्हेकर, प्रा. संजय मुंढे, हनुमान कुटे, जगन्नाथ घुले, देवराव हारकळ, राजाभाऊ चव्हाण, नामदेव तिडके, शिवाजीराव देशमुख, सदाशिवराव देशमुख, टि.एम. सामाले, शंकर देशमुख, सुभाष सामाले, सचिन पुके, प्रभाकर कदम, भारत सामाले, नागोराव देशमुख, एकनाथ देशमुख, डॉ. कल्याण देशमुख, संजय जोशी आदीसह टाकळी कुंभकर्ण व पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते. या गायत्री महायज्ञ सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.