24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीय२२ दिवसांत ३८ लाख विवाह; तब्बल ४.७४ कोटींची उलाढाल

२२ दिवसांत ३८ लाख विवाह; तब्बल ४.७४ कोटींची उलाढाल

नवी दिल्ली : दिवाळी काळात रेकॉर्डब्रेक व्यवसाय झाल्यानंतर आता देशातील व्यापारी समुदाय २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माध्यमांना सांगितले की, २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान देशात सुमारे ३८ लाख विवाह होणार आहेत. ३८ लाख विवाहांवर सुमारे ४.७४ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत म्हणजेच या काळात तब्बल ४.७४ कोटींची उलाढाल होणार आहे.

प्रमुख वितरण केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध राज्यांतील ३० शहरांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा या दोन्ही प्रमुख व्यापारी संघटनांमधील विविध भागधारकांशी बोलल्यानंतर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या हंगामात देशभरात सुमारे ३८ लाख विवाहसोहळे पार पडण्याची शक्यता आहे. अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागांचा या आकडेवारीत समावेश नाही. गेल्या वर्षी याच कालावधीबद्दल बोलायचे झाले तर देशात सुमारे ३२ लाख विवाह झाले. त्यामुळे ३.७५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, या हंगामात लग्न समारंभांवर होणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के खर्च वस्तूंच्या खरेदीवर केला जाईल. उर्वरित ५० टक्के रक्कम सेवा खरेदीवर खर्च केली जाईल. एका दृष्टीक्षेपात, व्यापारी क्षेत्रातील व्यापाराची अंदाजे टक्केवारी कापड, साड्या, लेहेंगा आणि वस्त्रांमध्ये १० टक्के, दागिन्यांवर १५ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवर ५ टक्के, सुका मेवा, फळे, मिठाई आणि नमकीनमध्ये ५ टक्के, अन्नधान्यावर ५ टक्के, किराणा आणि भाजीपाला यावर ५ टाके, भेटवस्तू आणि उर्वरित वस्तूंवर ६ टक्के खर्च होण्याची शक्यता आहे.

‘हे’ दिवस लग्नासाठी शुभ
प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवूथान एकादशी म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. विशेषत: सनातन धर्माचे पालन करणाऱ्या समाजात हे विवाह १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. तारकांच्या गणनेनुसार, नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या तारखा २३,२४,२७,२८ आणि २९ आहेत. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात लग्नाच्या तारखा ३,४,७,८,९ आणि १५ आहेत. हे दिवस लग्नासाठी शुभ मानले जातात.
तसेच दुसऱ्या टप्प्यात जानेवारीच्या मध्यापासून लग्नासाठी शुभ दिवस सुरू होतील. हा हंगाम जुलै २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR