33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरवाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनात ४० टक्के घट

वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनात ४० टक्के घट

सोलापूर : वाढत्या तापमानाने दूध उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. या स्थितीत प्रतिकारक्षमता घटल्याने जनावरे संसर्गजन्य आजार व उष्माघातापासून वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.जनावरांना दिवसाप्रमाणे रात्री देखील पाणी पाजावे असा सल्ला देण्यात आला आहे.

जिल्ह्यात तापमानाचा आकडा ४० अंशावर गेला आहे. या तापमानात पुढील काळात आणखी वाढच होणार आहे. या स्थितीत दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. जून पर्यंत दूध उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम दूध उत्पादकांच्या अर्थकारणावर झाला आहे.

या कालावधीत जनावरांना मिळणारा चारा हा निकृष्ट दर्जाचा असतो. हिरवा चारा फारसा मिळत नाही. त्यामुळे प्रथिनांचा आहार जनावरांना कमी प्रमाणात मिळतो. उन्हाळ्यात जनावरे दिवसभर दाट सावलीत असावीत , दिवसासोबत रात्री देखील जनावरांना पाणी देणे गरजेचेशक्य झाल्यास हिरवा चारा जनावरांना द्यावा, रोगाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे, जनावरे पाण्याने धुवावेत अशी काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत.

तसेच दूध उत्पादन घटण्यासोबत उन्हाळ्यात दुधाळ जनावरांमध्ये गर्भधारणा देखील कमी प्रमाणात होते दूध उत्पादकांनी या स्थितीत जनावरांना अत्यंत काळजीपूर्वक सांभाळण्याची गरज आहे असे जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. तानाजी गिड्डे यांनी सांगीतले. प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे लाळ्या खुरकूत, संधी सारख्या आजाराला जनावरे सहज बळी पडतात. प्रतिकारक्षमता घटल्याने त्यांची स्थिती अधिकच क्षीण ठरते. त्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR