31.2 C
Latur
Monday, June 3, 2024
Homeमहाराष्ट्रईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय ४०० पार अशक्य

ईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय ४०० पार अशक्य

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यांची सगळी मदार ईव्हीएम मशिनवर आहे. ईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय हे अशक्य आहे, असा दावा करताना, ईव्हीएम मशिन कशी हॅक कशाप्रकारे होऊ शकते याचे सादरीकरण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले. ईव्हीएममधील हॅकिंग थांबविण्यासाठी मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती पडताळणीसाठी मतदारांना मिळायला हवी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महाआघाडीत वंचितच्या समावेशाबद्दल अजूनही बोलणी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशिन कशी हॅक केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या नंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती मतदारांना मिळायला हवी. त्याची पडताळणी केल्यानंतर ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. या संदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणे अपेक्षित असते मात्र उमेदवारांनी पुनर्मोजणीसाठी व्हीव्हीपॅटची मागणी केली तर यामध्ये निकाल कोणता मानायचा, अशी शंका आंबेडकर यांनी उपस्थित करीत व्हीव्हीपॅटचा निकाल अंतिम असेल या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाकडे आग्रह होत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षांना घेऊन जाऊ व या मधील वस्तूस्थिती सांगू, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले.

१९८५ आणि १९८९ ची निवडणूकसुद्धा बॅलेट पेपरवर झाली होती. मतदानानंतर दुस-या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर रात्री १२ च्या आधी निकाल लागायचा त्यामुळे बॅलेट पेपरवरील मतदान मोजायला १५ दिवस लागतील, असा नव्या पिढीला सांगितला जाणारा प्रचार चुकीचा असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR