24.7 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeउद्योग५ बँकांना आरबीआयने ठोठावला दंड

५ बँकांना आरबीआयने ठोठावला दंड

मुंबई : रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या ५ सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या बँकांना ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. २०२४ या वर्षाच्या सुरुवातीलाच पाच बँकांवर मोठी कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रिझर्व्ह बँकेने पाच बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये श्री भारत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (वडोदरा, गुजरात) आणि संखेडा नागरीक सहकारी बँक लिमिटेड (छोटौदेपूर, गुजरात) या दोन बँकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर संखेडा नागरी सहकारी बँक लिमिटेडने अशी कर्जे मंजूर केली, ज्यात बँकेच्या संचालकांचे नातेवाईक जामीनदार म्हणून उभे होते. आरबीआयकडून को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (परलाखेमुंडी, ओडिशा) आणि भुज कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (कच्छ गुजरात) यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने लिमडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर सर्वात कमी दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ५० हजार रुपये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR