मला माझे ९०० रुपये परत द्या!

मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणा-या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनी निकाल आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, समीर कुलकर्णी यांनी माझे ९०० रुपये मला परत करा अशी मागणी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून ९०० रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर साडेसातशे रुपये दाखवले. ते ९०० रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीये’ असे म्हटले. कुलकर्णी यांनी असे म्हणताच यावर ‘कोणताही मुद्देमाल परत देण्याचा कोर्टाचा आदेश नाही’ असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

 मी आनंदी आहे : निवृत्त मेजर रमेश उपाध्याय 

याप्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आनंदी आहे. कोर्टाच्या या निर्णयाने आमच्यावरचा डाग पुसला’असे रमेश उपाध्याय यांनी म्हटले.

निरपराध लोकांना गोवण्याच्या प्रयत्न : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार 
‘जेव्हा हा खटला दाखल करण्यात आला तेव्हाच राज्य, देशामध्ये या विषयावर चर्चा झाली. काही निरपराध लोकांना गोवण्याच्या प्रयत्न होत नाही ना? या खटल्यामध्ये काही राजकारण तर होत नाही ना? अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आज निर्दोष मुक्तता झाली तरी यामध्ये शंका व्यक्त केली. त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news