22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयदेशात नोक-यांमध्ये ६ टक्क्यांची घट

देशात नोक-यांमध्ये ६ टक्क्यांची घट

नोकरी डॉट कॉमचा अहवाल जारी सन २०२४ मध्ये बिकट परिस्थिती निर्माण होणार

नवी दिल्ली : सन २०२३ मध्ये व्हाईट कॉलर जॉबमध्ये घट झाली आहे. ऑनलाइन जॉब प्लॅटफॉर्म नोकरी डॉट कॉमने देशातील व्हाईट कॉलर नोक-यांबाबतचा डेटा गोळा केला आहे. त्यानुसार, सन २०२३ मध्ये भारतात व्हाईट कॉलर नोक-यांमध्ये ६ टक्क्यांची घट झाली आहे. आयटी, रिटेल, बीपीओ, शिक्षण, एफएमसीजी, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात नोक-या कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

जागतिक आर्थिक संकट आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे व्हाईट कॉलर नोक-यांची संख्या घटली आहे. यामध्ये जागतिक अनिश्चितता असूनही पायाभूत सुविधा, तेल आणि वायू, रिअल इस्टेट, वीज, प्रवास इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. त्याचा परिणाम हायरिंगच्या आकडेवारीवर दिसून येत आहे. २०२३ मध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये कमी भरती केली आहे. व्हाईट कॉलर नोक-यांबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी व्हाईट कॉलर नोक-यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. परंतू, कंपन्या अत्यंत सावधगिरीनेच नवीन भरती करतील. यासह, कमी भरती, चांगली व्यवसाय वाढ आणि जीडीपीच्या आकडेवारीमुळे कौशल्याची कमतरता २०२३ मध्ये देशात व्हाईट कॉलर नोर्क­यांच्या संख्येत वाढ होईल. बीएफएसआय आणि एफएमसीजी कंपन्यांमध्ये नियुक्ती प्रक्रियेत अधिक सावधगिरी बाळगली जाईल.

आयटी क्षेत्राची स्थिती कशी असणार?
नोकरी डॉटकॉमच्या आकडेवारीनुसार, २०२३ हे वर्ष आयटी क्षेत्रासाठी फारसे चांगले ठरले नाही. कारण यावर्षी भरतीमध्ये २९टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. तर २०२२ मध्ये आयटी क्षेत्रातील नोकरभरतीत ७ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. या डेटामध्ये कॅम्पस प्लेसमेंट, गिग हायरिंग यासारख्या भर्तींचा समावेश केलेला नाही.

२०२४ मध्ये अधिक नोक-यांची अपेक्षा
नोकरी डॉटकॉमच्या माहितीनुसार, नवीन वर्षात आयटी क्षेत्रातील नोक-यांमध्ये घट होऊ शकते, तर विमान वाहतूक, दूरसंचार, लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील नोक-यांमध्ये वाढ होऊ शकते. दिल्ली/एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे नवीन भरतीमध्ये घट दिसून आली आहे, तर अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूरमध्ये नोक-यांची संख्या वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR