28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयतेलंगणा विधानसभा निवडणुकीत ६० हजार ईव्हीएमचा होणार वापर

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ६० हजार ईव्हीएमचा होणार वापर

नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सुमारे ६० हजार ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने सरकारी मुद्रणालयाला प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांच्या यादीवर आधारित मतपत्रिका छापण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सरकारी निवेदनानुसार, निवडणुकीसाठी ५९,७७९ ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत. तसेच आवश्यकतानुसार अतिरिक्त १४,५०० ईव्हीएमचे १६ जिल्ह्यांना वाटप करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, पहिल्या स्तरावरील छाननीनंतर, मतदारसंघ/मतदान केंद्रांचे वाटप यादृच्छिकपणे केले जाईल. या निवडणुकीत एकूण ५९,७७९ ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. निवेदनानुसार, हैदराबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांसह मतदारसंघनिहाय सर्व ३३ जिल्ह्यांसाठी मतमोजणी केंद्रांची यादी देखील अंतिम करण्यात आली आहे. निवेदनानुसार, सुरक्षेसह सर्व आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत आणि आतापर्यंत ३.२६ कोटी स्लिपपैकी १.६५ कोटी पेक्षा जास्त स्लिप मतदारांमध्ये वितरित करण्यात आल्या आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरती पूर्ण करायची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR