अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. त्यात १०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत प्रवाशांत ४ केबिन क्रू व ३ प्रवासी अशा एकूण ७ मराठी प्रवाशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे क्रू सदस्या अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. त्यात १२ क्रू मेंबर्स व २३० प्रवासी होते. १२ एक क्रू मेंबर असणा-या अपर्णा महाडिक (कर्मचारी संख्या: ८०००८८७२) या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वत:ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तासांपूर्वी दिल्लीत लँड झालेत.
त्यानंतर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले.
अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंघरे या ६ मराठी प्रवाशांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. पण त्यांची पुष्टी अद्याप झाली नाही. मैथिली पाटील (कर्मचारी संख्या: ८००४७४२९), दीपक पाठक (कर्मचारी संख्या: ८१०३३१८७) व रोशणी सोंघरे (कर्मचारी संख्या : ८००५५१४६) हे तिघेजण अपर्णा महाडिक यांच्यासारखेच एअर इंडियाचे केबिन क्रू होते.