कोलकाता : भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय आधीच घ्यायला हवा, होता असाही सूर उमटताना दिसतोय. त्यात आठवड्याभरानंतर स्पर्धा पुन्हा सुरु करणे शक्य होईल का? हा नवा प्रश्न चर्चेत आहे. यासंदर्भात बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि दिग्गज क्रिकेटर सौरव गांगुलीने मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान अधिक काळ भारताचा दबाव सहन करू शकत नाही, त्यामुळे आयपील स्पर्धा लवकर पुन्हा सुरु होईल असे गांगुलीने म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशाला येथील मैदानात रंगललेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थांबवल्यावर दुस-या दिवशीच आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली.
सौरव गांगुली एएनआयशी संवाद साधताना म्हणाला आहे की देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडू सहभागी आहेत. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू होईल अशी आशा करुयात. कारण स्पर्धा महत्त्वपूर्ण टपप्यात आहे.