35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस कधीही न संपणारा पक्ष

काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच

सातारा : काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

सातारा दौ-यावर असताना प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष संपेल असा विचार जे लोक करत असतील त्यांना देशाचा इतिहासच माहित नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या स्वातंत्र सैनिकांचा मान ते राखत नाहीत व त्यांची किंमतही त्यांना कळलेली नाही. स्वातंर्त्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या दोन पंतप्रधानांचे बलिदान झाले, हे ते विसरतात. महात्मा गांधी यांचा खून करणा-या अतिरेक्याला ते विसरतात. अशी वक्तव्ये करणे म्हणजे राष्ट्रद्रोह असू शकतो का, असा प्रतिप्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

चव्हाणांना आदरांजली
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेस पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना सपकाळ म्हणाले की आज देशावर संकट आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याची आज आठवण झाली. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता या ६० च्या दशकातील इतिहासाचे स्मरण केले, त्यावेळी विपरित परिस्थितीत भारत निकराने लढला व विजयी झाला, त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून आपण आज पुन्हा भारतीय लष्काराच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. चव्हाण साहेबांच्या खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुर्नजन्म होईल व भारतीय लष्कर मोहिम फत्ते करील याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

राजकारण्यांनी आदर्श निर्माण करावा
महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला, त्यांच्या आचार विचारांची आठवण झाली. सार्वजनिक जीवनात वावरताना राजकारण्यांनी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे त्याची आठवण झाली. प्रांताध्यक्ष नात्याने काँग्रेस पक्ष पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माचा सभ्य, सुसंस्कृत राजकारणाचा नेमकेपणाने गाभा व दिशा काय असावी याचे स्मरण केले असेही सपकाळ यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR