24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायलने सीझफायर तोडले

इस्रायलने सीझफायर तोडले

ट्रम्प प्रचंड नाराज तातडीने वैमानिकांना माघारी बोलवा

वॉशिंग्टन : इराण-इस्रायलयुद्धात सीझफायर झालेले असताना मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको होता असे ट्रम्प म्हणाले आहेत.

इस्रायल, ते बॉम्ब टाकू नकोस. जर तुम्ही असे केले तर ते मोठे उल्लंघन आहे. तुमच्या वैमानिकांना ताबडतोब माघारी बोलवा असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. युद्धविराम लागू झाल्यानंतर लगेचच हल्ला करण्याची कृती मला आवडलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इस्रायलने इराणवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. इराणने त्यापूर्वीच आपण हल्ला केला होता, असे सांगत हे आरोप फेटाळले होते. यानंतर इस्रायलने देखील इराणवर हल्ले चढविले आहेत. यामुळे आता ट्रम्प भडकले आहेत.

इराणवर मी खूश नाहीय पण इस्रायलवर खूप नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बीर शेवा शहरावर हल्ला झाला तेव्हा आम्ही इस्रायलवर शेवटची मिसाईल डागली होती. तेव्हा शस्त्रसंधीची घोषणा झाली नव्हती. आम्ही स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केला होता. यानंतर एकही मिसाईल इस्रायलकडे गेलेली नाही असे इराणने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR