24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयब्रिटनचे मालवाहू विमान भारतात

ब्रिटनचे मालवाहू विमान भारतात

युद्धनौका समुद्रात नांगर टाकून लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते

लंडन : इराण-इस्रायल युद्ध काळात ब्रिटनचे स्टील्थ फायटर जेट एफ-३५ केरळच्या विमानतळावर उतरविण्यात आले होते. याला आता पंधरवडा उलटला तरी देखील ते लढाऊ विमान काही परत जाऊ शकलेले नाही. आता हा तांत्रिक बिघाड ठीक करण्यासाठी ब्रिटीश नेव्हीने ४० इंजिनिअरांची टीम भारतात पाठविली आहे.

केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. या विमानाच्या संरक्षणासाठी सीआयएसएफ सुरक्षा पुरवत आहे. हे विमान पुन्हा आकाशात झेपावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतू ते व्यर्थ ठरले आहेत. हायड्रॉलिक बिघाडामुळे हे विमान केरळमध्ये उतरविण्यात आले होते. तिरुअनंतपुरम विमानतळावर हे विमान गेले १४ दिवस उभे आहे.

काही इंजिनिअर ब्रिटनने पाठविले होते. परंतू, त्यांना हे विमान दुरुस्त करण्यास अपयश आले आहे. यामुळे आता ब्रिटिश अभियंते आणि तज्ज्ञांची ४० सदस्यांची टीम देखील केरळला आली आहे. या विमानाची दुरुस्ती करण्यासाठी ब्रिटनहून एक टो व्हेईकल देखील आणले आहे. एफ-३५ ला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ पार्क केल्याबद्दल विमानतळावर पार्किंग शुल्क देखील द्यावे लागू शकते. या विमानाचे कमी इंधनामुळे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.

केरळच्या किना-यापासून १०० नॉटिकल मैल अंतरावर या ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका आहे, तिथे त्याला जायचे आहे. परंतू उड्डाणच करू न शकल्याने ते शक्य झालेले नाही. रॉयल ब्रिटिश नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले एफ-३५बी लाइटनिंग २ हे ते विमान आहे. भारतीय हवाई दलाने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले, इंधन भरणे आणि लॉजिस्टिक सहाय्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR