उदगीर : प्रतिनिधी तालुक्यातील भीमा तांडा येथील पित्याने आपल्या चार वर्षीय चिमुरडीला फाशी देऊन खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी बालाजी बाबु राठोड (वय वर्ष ३६) याने त्याची चार वर्षीय मुलगी आरुषीने चॉकलेट मागितल्याचा राग मनात धरुन साडीने फाशी देऊन खून केला. ही घटना दि २९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडले. या प्रकरणी आरोपीची पत्नी वर्षा बालाजी राठोड राहणार भीमा तांडा याच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी बाबू राठोड यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षिक देवकते हे करीत आहेत.

