मुंबई : मी एकदाही शेतक-यांच्या विरोधात बोलललो नाही. तरीही मी शेतक-यांची एक हजार वेळा माफी मागायला तयार आहे. पण मी यांची माफी मागणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत घेतली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालपासून बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतक-यांच्या प्रश्नांवर विधानसभेत तीव्र पडसाद उमटत आहेत.
त्यावर बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना धारेवर धरले. बबनराव लोणीकर विधानसभेत बोलताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. ४० वर्ष मी राजकारणात आहे. मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. पण मी असे काही बोललोच नाही. काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. मी शेतक-यांची एक हजार वेळा माफी मागेल, पण मी यांची माफी मागणार नाही असेही लोणीकर यांनी यावेळी म्हटले.