28.5 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंना मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा

जरांगेंना मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा

  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, राज्यभरातून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पांिठबा मिळत आहे. पुण्यात कोंढव्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला जात आहे व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जात आहे. कोंढवामध्ये ज्योती चौकात लाक्षणिक उपोषण केले जात आहे.

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, तर कोंढव्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जात आहे.
तर काही भागामंध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.

काही ठिकाणी बस पेटवण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी बस फोडण्यात आल्या आहेत. कालपासून बीडमध्ये आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR