नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने चीन आणि पाकिस्तान सीमेवर एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे. जे आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. भारताने ही यंत्रणा रशियाकडून खरेदी केली असून सध्या भारताला तीन स्क्वॉड्रन मिळाले असून उर्वरित दोन स्क्वॉड्रन्स वर्षभरात मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एस-४०० हे ६०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य शोधते आणि ४०० किलोमीटरवर पोहोचताच ते त्याला नष्ट करते. याचा अर्थ चीन किंवा पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाला तर तो हवेतच हाणून पाडेल. याद्वारे लढाऊ विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारखे कोणतेही आक्रमण करणारी शस्त्रे नष्ट केली जाऊ शकतात.
तसेच डीआरडीओ, हवाई दल आणि नौदलासाठी स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली देखील बनवत आहे. भारताने २०१८-१९ मध्ये एस-४०० क्षेपणास्त्रांच्या पाच स्क्वॉड्रनसाठी रशियन बाजूसोबत ३५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या करारावर स्वाक्षरी केल्या होत्या, त्यापैकी तीन आधीच भारताला मिळालेल्या आहेत. परंतु उर्वरित दोनची डिलिव्हरी अजूनही प्रलंबित आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे ते भारताला मिळू शकलेले नाही. उर्वरित दोन क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनच्या अंतिम वितरण वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी रशियन आणि भारतीय अधिकारी लवकरच पुन्हा भेटणार आहेत. रशियन बाजू अंतिम वितरण टाइमलाइनबद्दल फारशी स्पष्ट नाही कारण ते देखील युक्रेनशी संघर्षात व्यस्त आहेत.
जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालीं
एका स्क्वाड्रनमध्ये आठ लाँचर असतात जे आठ ट्रकमध्ये येतात. ते एकाच वेळी ३२ क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात आणि एकाच वेळी १०० लक्ष्ये ओळखून त्यांना टार्गेट करते. ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते.