20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeराष्ट्रीयतुम्ही जिथे असाल तिथेच माझा सण; पंतप्रधानांनी घेतली जवानांची भेट

तुम्ही जिथे असाल तिथेच माझा सण; पंतप्रधानांनी घेतली जवानांची भेट

शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहचले आहेत. दरवर्षी पंतप्रधान मोदी लष्करासोबत दिव्यांचा सण दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे म्हणाले की, असे म्हटले जाते की, अयोध्या तिथेच आहे, जिथे प्रभू राम आहेत आणि माझ्यासाठी, जिथे भारतीय सैन्य आहे, जिथे माझ्या देशाचे सुरक्षा दल तैनात आहे, ते ठिकाण कोणत्याही मंदिरापेक्षा चांगले आहे. त्यापेक्षा कमी नाही. तुम्ही जिथे असाल तिथेच माझा सण आहे, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सध्याच्या परिस्थितीत भारताकडून अपेक्षा सातत्याने वाढत आहेत. अशा महत्त्वाच्या काळात भारताच्या सीमा सुरक्षित राहणे, देशात शांततेचे वातावरण निर्माण करण्यात सुरक्षा दलाची खूप मोठी भूमिका आहे. जोपर्यंत आपले सैन्य हिमालयाप्रमाणे आपल्या सीमेवर खंबीर आणि अटल आहे तोपर्यंत भारत सुरक्षित आहे.

लेपचामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, समाधान आणि आनंदाने भरलेला हा क्षण, माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासियांसाठी दिवाळीचा नवा प्रकाश घेऊन येईल, असा मला विश्वास आहे. मी सर्व देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, हिमाचल प्रदेशातील लेपचासमध्ये आमच्या सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा अभिमानास्पद अनुभव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR