27 C
Latur
Thursday, March 12, 2026
Homeमहाराष्ट्र१४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता

१४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता

बँक खात्यात जमा होणार ३००० रुपये राज्यातील लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत होणार गोड

पुणे : येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट अशा प्रकारचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येत्या १४ जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे, याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत.

तर राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आहे. तर, महायुतीतील दोन घटकपक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये, १४ जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत! सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेह-यावर हसू फुलवण्याचे काम देवाभाऊ आणि महायुती सरकारने केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहि­णींच्या खात्यावर ३००० रूपये येतील, असा वादा प्रचारावेळी केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या योजनेचा प्रचार आक्रमकपणे केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला असून डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या हप्त्यांची मात्र लाभार्थी प्रतीक्षा करत आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होत असून त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या कालावधीत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल, अशी चर्चा सुरू होती. अशातच भाजप नेत्या तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या दाव्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR