बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेल्या आणि गुन्हेगारी प्रकरणांनी गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी, महिला आयोगाने दखल घेतली आहे. बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील महिला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे.

राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून तपास अधिका-यांशी फोनवरुन संवाद साधला. आता, पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरुनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ३३३, ६४ (२) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे.

या तपासा दरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलिस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्ष अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?
१० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीने आणि कपड्याने बांधून ठेवले आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडवून घरी नेले. घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, शेवटी तिने हिम्मत करून आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर, आरोपी वैभव पटेकर यास अटक करण्यात आली असून १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news