30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरखासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

लातूर : प्रतिनिधी

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत मोदी सरकारकडून लोकशाही मुल्यांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी लोकशाही बचाव, देश बचावाच्या घोषणा देत लोकशाही बचाव दिवस पाळण्यात आला. या निदर्शनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीची हत्त्या करत हुकूमशाही पद्धतीने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडीच्या) १५० खासदारांचे निलंबन केले आहे. त्यामुळे महात्मा गांधी चौकात लातुर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘लोकशाही बचाव दिवस’ पाळून केंद्रातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ध्यानस्त पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन निदर्शने आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, काँग्रेसचे नेते अ‍ॅड. समद पटेल, प्रदेश चिटणीस गोरोबा लोखंडे, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, प्रभाग अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, संजय ओहळ, आसिफ बागवान, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, विशंभर भोसले, तब्रेज तांबोळी, ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष जालिंदर बरडे, हमीद बागवान, संजय पाटील खंडापूरकर, प्रमोद जोशी, शीतलताई मोरे, केशरताई महापुरे, सुरेखाताई कारपुरेकर, कमलताई शहापूरकर, लक्ष्मीताई कांबळे, मीनाताई टेंकले, सायराताई पठाण, सुमनताई चव्हाण, अनिता काळे, राणी लांडगे, पार्वती लोखंडे, यशपाल कांबळे, अकबर मंडजे, अजित माने, हमीद शेख, अजित नाईकवाडे, अभिजित इगे, विष्णू धायगुडे, विजय टाकेकर, राजाभाऊ गायकवाड, पवन गायकवाड, बब्रुवान गायकवाड, भाऊसाहेब बडीकर, अभिषेक पतंगे, प्रा. एम. एच. शेख, धनराज गायकवाड, राजु गवळी, राज क्षीरसागर, कुणाल वागच, ख्वॉजापाशा शेख, पिराजी साठे, अमोल गायकवाड, जय ढगे, अ‍ॅड. अंगद गायकवाड, संजय सुरवसे, किरण बनसोडे, पंकज सोनवणे, करण गायकवाड, रामकिशन शिंदे, जाफर पटवेकर, आकाश मगर, मैनोद्दिन शेख, अशोक गायकवाड, श्रावण मस्के, पवन बनसोडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR