छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. आंदोलन, उपोषण तसेच सततच्या दौ-यांमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. अशातच आता आपला पाचव्या टप्प्यातील दौरा, कार्यक्रम आटोपून जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रवाना झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा नियमित दौरा सुरू असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत आहे.
त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची तयारी करणार आहेत.