छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, २०२३ च्या परीक्षेत चक्क २०१९ चाच पुन्हा पेपर देण्यात आला आहे. बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली असून, राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र याच परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा वेगळाच गोंधळ समोर आला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका २०२३ च्या परीक्षेत जशास तशी छापण्यात आली आहे. त्यामुळे यावर विध्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.
राज्यभरात बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा आयोजित केली आहे. मात्र, परीक्षा केंद्रात जाताच विध्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. कारण, २०१९ च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा २०२३ च्या परीक्षेत विध्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे २०१९ च्या पेपरची जशास तशी कॉपी करण्यात आली आहे.
अगदी प्रश्न आणि प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच आहे. २०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर २०२३ च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आहे. आता यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे, त्यांना या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.