‘नीट’ घोटाळ्याच्या किंगपिनचे ‘काळे’ साम्राज्य; लातूर उद्योग भवनातील मोटेगावकरच्या टोलेजंग इमारतीचे गूढ काय?

लातूर (विशेष प्रतिनिधी) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या (CBI) अटकेत असलेला लातूरचा प्रा. शिवराज मोटेगावकर सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. मात्र, सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मोटेगावकरच्या केवळ परीक्षा घोटाळ्याचीच नव्हे, तर त्याच्या लातुरातील ‘रग्गड’ आणि अनधिकृत संपत्तीची चर्चा आता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी राखीव असलेल्या लातूरच्या ‘उद्योग भवन’ परिसरात मोटेगावकर यांनी नियम धाब्यावर बसवून आपले साम्राज्य उभे केल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील उद्योग भवन परिसरात प्रा. शिवराज मोटेगावकर याचे एक-दोन नव्हे, तर चक्क चार ते पाच मोक्याचे प्लॉट्स आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एका प्लॉटवर गेल्या अनेक दिवसांपासून एका टोलेजंग आणि अलिशान इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. एमआयडीसी आणि उद्योग भवनाचे नियम अत्यंत कडक असताना, एका शिक्षण सम्राटाने उद्योगांसाठी राखीव असलेल्या जागेवर हे बांधकाम कसे काय सुरू केले? हा आता मोठा प्रश्न बनला आहे.

औद्योगिक क्षेत्राच्या नियमांनुसार, उद्योगासाठी राखीव असलेल्या जागेवर किंवा प्लॉट्सवर केवळ कारखाने, प्रक्रिया उद्योग किंवा औद्योगिक व्यवसाय करणे बंधनकारक असते. या जागेचा व्यावसायिक वापर करून तिथे ट्युशन क्लासेस, कोचिंग सेंटर्स किंवा इतर अनधिकृत व्यवसाय चालवण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. मात्र, मोटेगावकर याने या नियमांना केराची टोपली दाखवत या भागात आपले पाय पसरल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मोटेगावकरच्या या अनधिकृत साम्राज्याविरोधात लातुरातील प्रसिद्ध माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी माहितीच्या अधिकारात कायदेशीर लढा सुरू ठेवला आहे. “उद्योगाच्या जागेवर ट्युशन क्लासेसचे दुकान मांडले जात आहे. अनेक प्रामाणिक आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण उद्योजक उद्योग भवनात जागेसाठी ‘वेटिंग’वर (प्रतीक्षेत) आहेत, मात्र प्रशासन या गंभीर विषयावर मूग गिळून गप्प आहे,” असा घणाघाती आरोप भाईकट्टी यांनी केला आहे. तसेच, मोटेगावकरची ही सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्यात यावीत आणि या जागा गरजू उद्योजकांना देण्यात याव्यात, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली आहे.

सीबीआयने नीट प्रकरणात मोटेगावकरला अटक केल्यानंतर आता त्याच्या आर्थिक नाड्या आणि मालमत्तांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्योग भवन परिसरात मोटेगावकरला कशाच्या जीवावर आणि कोणाच्या आशीर्वादाने ४ ते ५ प्लॉट्स मिळाले? अनधिकृत टोलेजंग इमारत उभी राहिली तरी स्थानिक प्रशासनाने डोळेझाक का केली? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मोटेगावकरच्या या ‘राग्गड’ संपत्तीचा पर्दाफाश झाल्याने आता त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. लातूरच्या शैक्षणिक ब्रँडला काळिमा फासणाऱ्या मोटेगावकरच्या या बेकायदेशीर साम्राज्यावर आता प्रशासन बुलडोझर चालवणार की सीबीआयच्या कारवाईनंतर ही संपत्ती जप्त होणार? याकडे आता संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56

Latest news