दिव्यांग क्षेत्रात सेवाभाव वृत्तीने कार्य आवश्यक 

लातूर : प्रतिनिधी
राज्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागा अंतर्गत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही अनेक दिव्यांग प्रवाहाच्या बाहेर आहेत. या क्षेत्रात सेवाभाव वृत्तीने कार्य केल्यास दिव्यांगांना आपलेसे वाटणार आहे. त्यामुळे सेवाभाव वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजीत बडे यांनी केले.
दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, लातूर व श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बोरी संचलित संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाच्या सभागृहात लातूर जिल्हयातील विशेष शाळा/कार्यशाळा/मतिमंद बालगृह यांच्या मुख्याध्यापक/व्यवस्थापकीय अधिक्षक यांची आढावा बैठक रविवारी संपन्न झाली. यावेळी पुणे येथील दिव्यांग आयुक्तालयातील लेखाधिकारी अनिल हगवणे, निरीक्षक भारत कांबळे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जि.प. लातूरचे संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजु गायकवाड, सहाय्य्क सल्लगार बाळासाहेब वाकडे, संस्थेचे अध्यक्ष अण्ण्णासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना आयुक्त बडे म्हणाले ‘दिव्यांग क्षेत्रातील शिक्षक कर्मचा-यांच्या समायोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासह मतिमंद प्रवर्गातील दिव्यांगाचे प्रमाणही वाढत आहे. यावरही उपाययोजना आवश्यक आहे.’
प्रास्ताविकात संस्था अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देत अनाथ मुलांच्या आधार कार्ड काढण्यासाठी येत असलेल्या अडचणीही सांगितल्या. लेखाधिकारी अनिल हगवणे यांनी दिव्यांग शाळांतील कर्मचा-यांच्या विविध अडचणी मांडत वेतनश्रेणीच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांकडे विशेष मागणी केली. निरीक्षक भारत कांबळे यांनी जिल्हयातील मुख्याध्यापकांच्या विविध समस्येचा आढावा घेतला यावर आयुक्त सत्यजीत बडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनेक सुचनाही केल्या. तत्पुर्वी आयुक्तांनी विद्यालयातील डिजीटल क्लासरूम, बेड रिटन मुलांची चौकशी व त्यांना असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत संस्थेचे कौतुक केले. यासह बालगृहातील व्यवसायिक वस्तु, ऑफीस फाईल, क्रीडारूम व जिमचीही पाहणी केली. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या आढावा बैठकीस जिल्हयातील ५५ मुख्याध्यापक, व्यवस्थापकीय अधिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन वाघ यांनी केले. तर आभार प्रदर्शन हर्षराज शेंद्रे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news