लातूर : प्रतिनिधी
जनकल्याण समितीचे दिव्यांग प्रकल्पाचे कार्य समर्पित भावनेने कार्यरत आहे. दिव्यांग व्यक्ती हा समाजातील उपेक्षित आहे. अशा वंचित व उपेक्षित विषयाकरिता जनकल्याण समिती कार्य करीत आहे. स्पेशल ऑलींपिक मध्ये ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचे कौतुक करत संवेदना दिव्यांग प्रकल्पाकरिता माझा व्यक्तीगत कंपनीच्या सीएसआर मधून दिव्यांगांना आर्थिक सहकार्य करण्याची योजना करेन. या ठिकाणी सेन्सरी पार्क निर्माण करण्यासाठी सेवा यु के यांनी जे सहकार्य केल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जकल्याण समिती संचलित, संवेदना दिव्यांग प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर येथे दिव्यांग व्यक्तींसाठी सेन्सरी पार्कचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे विभाग संघचालक संजय आग्रवाल होते. या कार्यक्रमास दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे, केशव तिपनबोणे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, विनायकराव डंबीर, सुनिल वसमतकर, शिरीष कुलकर्णी, डॉ. राजेश पाटील, अँड श्रीराम देशपांडे, दिव्यांग सक्षमीकण विभागाचे अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, आयुक्तालयाचे भारत कांबळे, उपायुक्त माळवदे, उमाकांत मद्रेवार, प्रकाश लातूरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र डॉ. राजेश पाटील यांनी सेन्सरी पार्क या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष अँड श्रीराम देशपांडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मयुरी बिल्लावार, राजू गायकवाड यांनी केले. राहुल देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
















