जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील ७ ते ८ शेतक-यांनी त्यांची शेती टि.एस. विंड पॉवर डे. या कंपनीकडे भाडे तत्त्वावर दिली होती मात्र कंपनीने एका वर्षामध्येच करार मोडल्याची तक्रार करीत, आमची फसवणूक केली असून आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला ठरल्याप्रमाणे जमिनीची रक्कम मिळावी अशी मागणी करीत रावणकोळा येथील शेतक-यांनी जळकोट तहसील कार्यालयासमोर या सोलर कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे .
शेतकरी केलेल्या आरोपानुसार मॅनेजर जाकीर शेख हे आमच्याकडे येऊन आमच्या जमिनी २८ वर्षे भाडेतत्वावर टि.एस. विंड पावर डे. या कंपनीच्या नावाने सोलार प्लॉन्टसाठी सन २०२५ मध्ये आमच्या जमिनी (भाडेतत्वावर) रजिट्री ऑफिसमध्ये मॅनेजर जाकिर शेख हे स्तव: येऊन त्यांनी टि.एस.विंड पावर डे. ‘कंपनीच्या नावाने भाडेतत्वावर जमिनी घेतल्या. त्यानंतर भाडेतत्वावानुसार आम्हाला भाडे ठरले होते. त्याप्रमाणे सन २०२५-२६ चे भाडे चेकद्वारे मिळाले आहे. त्यानंतर आमच्या शेतात सदरील मॅनेजर जाकिर शेख यांनी झाडे तोडली व आम्हा सर्व शेतक-यांच्या जमिनी लेवल केल्या व तुमचे करारानुसार भाडे सुरू झाले असे सांगितले.
त्यानंतर शेतक-यांनी सन २०२६-२७ चे भाडे मागण्यासाठी मागील ४ महिण्यापासून त्यांच्या कार्यालयात जात होतो. मागील दोन महिण्याखाली तुम्हाला भाडे टाकतो म्हणून शेतक-याकडून आधार, पॅन, बैंकपास बुक व इतर कागदपत्रे घेतली परंतु आज दि.२० मे २०२६ रोजी टि.एस.विंड पावर डे. कंपनीच्या कार्यालयात सर्व शेतकरी गेले असता मॅनेजर जाकिर शेख हे कार्यालयात उपस्थित नव्हते. यावेळी शेतक-यांनी त्यांना फोन केला असता सदरील मॅनेजर जाकिर शेख यांनी तुमचे पैसे देत नाही, आता आम्हाला लिजने घेतलेल्या तुमच्या जमिनीची गरज नाही. लिज रद्द करा असे सांगितले.
















