माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर?

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात खळबळ उडवून देणा-या टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात एक मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांची आतापर्यंत विशेष तपास पथकाकडून तीन वेळा कसून चौकशी करण्यात आली आहे. मतीन पटेल यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून या प्रकरणात आता माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटीकडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यामध्ये एसआयटीने आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मोबाईल डेटा आणि तांत्रिक तपासातून समोर आलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे, पोलिस येत्या काही दिवसांत न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र देखील दाखल करणार आहेत.

पॉलिटिकल कनेक्शनवर स्पष्टीकरण
आरोपी निदा खानला घर मिळवून दिल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या मतीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप साफ चुकीचा आणि निराधार आहे असे पटेल यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news