मोदींच्या प्रकल्पांमुळे बेटांना नुकसान

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून केंद्र सरकारवर टीका केली. या प्रकल्पामुळे बेटावरील पर्यावरण आणि स्थानिक समुदायांचे नुकसान करून व्यावसायिक हितांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रेट निकोबार दौ-यादरम्यान त्यांनी स्कूबा डायव्हिंग करत कोरल रीफचा अनुभव घेतला आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. या दौ-याचा व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी अलीकडेच भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील इंदिरा पॉइंटला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बेटावरील आदिवासी समुदाय आणि स्थायिक रहिवाशांशी चर्चा केली. त्यांच्या मते, वनहक्क कायद्याचे उल्लंघन करून आदिवासींच्या जमिनी हिरावल्या जात आहेत, तर सरकारने पुनर्वसित केलेल्या माजी सैनिकांसह इतर स्थायिकांना योग्य भरपाई मिळत नाही. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये ते ग्रेट निकोबारच्या समुद्रात कोरल रीफजवळ स्कूबा डायव्हिंग करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधतानाचे दृश्यही व्हीडीओमध्ये दाखवले आहेत.

केंद्र सरकार या प्रकल्पाला सामरिक आणि संरक्षणाशी संबंधित उपक्रम म्हणून सादर करत असल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संरक्षण हेच खरे उद्दिष्ट असेल, तर अंदमान निकोबार बेटांमधील भारतीय नौदलाच्या हवाई तळाचा भाग असलेल्या ‘आयएनएस बाज’चा विस्तार करावा, असे त्यांनी म्हटले. ‘‘आयएनएस बाजचा विस्तार करा, आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ. नौदल गेली पाच वर्षे विस्ताराची मागणी करत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

ट्रान्सशिपमेंट बंदराच्या दाव्यावरही प्रश्न
ग्रेट निकोबार प्रकल्प ट्रान्सशिपमेंट बंदरासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचा सरकारचा दावा त्यांनी फेटाळून लावला; केरळमध्ये आधीच अशी सुविधा विकसित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

१.५ कोटी झाडे तोडली जाणार
राहुल गांधींनी पुढे आरोप केला की, या प्रकल्पामुळे १.५ कोटी झाडांची कत्तल होईल, आदिवासी समुदाय आणि लष्करी कर्मचा-यांचे विस्थापन होईल आणि प्रवाळ बेटांचे नुकसान होईल. त्यांनी असाही दावा केला की अधिकृत नकाशांमधून प्रवाळ बेटांची माहिती वगळण्यात आली आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या जमिनीवर व्यावसायिक विकासाला चालना दिल्याचा आरोप सरकारवर केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06

Latest news