दारूच्या नशेत मित्रांनी केला मित्राचा निर्घृण खून

परभणी : दारूच्या नशेत असलेल्या मित्रांचा वाद होऊन या वादानंतर मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. १० जून रोजी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गुन्हा लपविण्यासाठी युवकाचा मृतदेह टाकळी कुंभकर्ण येथील गायरान जमिनीत फेकून दिला असल्याची माहिती समोर आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव अशोक भगवान मोरे (वय ३५, रा. धर्मापुरी) असे असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अशोक मोरे हा आपल्या दोन मित्रांसोबत टाकळी कुंभकर्ण शिवारातील पोद्दार शाळेमागील भागात दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मित्रांनी अशोकला काठी तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोकचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने दुस-या दिवशी अशोकचा मृतदेह घटनास्थळावरून उचलून टाकळी कुंभकर्ण येथील गायरान जमिनीवरील गोरक्षण परिसरात आणून टाकल्याची माहिती उघड झाली आहे.

गायरान जमिनीवर मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या खुनामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51

Latest news