पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण : पुढील सुनावणी २० तारखेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणा-या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची दाट शक्यता होती; मात्र निकाल देण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे सांगितले.

आज सकाळी ११ वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, तेव्हा पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह न्यायालयात उपस्थित होते. तसेच, या घटनेत मृत झालेले पवनराजेंचे चालक समद काझी यांचे कुटुंबही न्यायाच्या आशेने मुंबईत दाखल झाले होते. मात्र, न्यायाधीशांनी निकालासाठी पुढील तारीख दिल्यामुळे दोन्ही कुटुंबांची प्रतीक्षा आणखी ताणली गेली आहे. यापूर्वी १४ मे रोजी झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी वैद्यकीय कारणास्तव मुदत मागितली होती.

२००६ मध्ये झाली होती हत्या
राजकीय वैमनस्यातून ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा थरार घडवला होता. सीबीआयच्या तपासांनुसार, ही हत्या २५ लाखांची सुपारी देऊन घडवून आणली गेली होती आणि यामध्ये राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या खटल्यात डॉ. पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशातील बसपा नेते कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन असे एकूण ९ आरोपी आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर २००९ पासून जामिनावर बाहेर आहेत.

धाराशिव पोलिसांना हाय अलर्ट जारी
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात पोलिसांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर गट यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक खबरदारी घेतली जात आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून, सोशल मीडियावरील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी सायबर पोलिस सज्ज आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31
Video thumbnail
Pandharpur Accident|पंढरपूर-म्हसवड महामार्गावर भीषण दुर्घटना;पिकअप विहिरीत कोसळून14 भाविकांचा मृत्यू
01:45
Video thumbnail
Nagesh Ashtikar ON Opration Tiger|आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबतच - नागेश आष्टीकर #marathilivenews
02:34
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14

Latest news