नीट परीक्षेच्या प्रवेशपत्राचा घोळ सुरूच

मुंबई : नीट पुनर्परीक्षा येत्या रविवारी (दि. २१ जून) होत आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षा शुल्काच्या परताव्याची बँक खात्याची तपशिलाची अट घातली आहे. प्रवेशपत्र आणि शुल्क परतावा या दोन्ही प्रक्रिया राष्ट्रीय परीक्षा संस्थेने एकत्रित राबविल्याने पुन्हा एकदा नीट परीक्षार्थींचे टेन्शन वाढले आहे. त्यातच सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीने परीक्षार्थी हवालदिल झाले आहेत.

वैद्यकीय पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी अद्याप देशभरात नोंदणी केलेल्या २२ लाखांपैकी केवळ ४ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड झाले आहेत. अद्याप १८ लाख ७९ हजार ७४३ विद्यार्थी प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) ही आकडेवारी जाहीर केली आहे. सोमवारी दिवसभर परीक्षार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड करत होते. मात्र बँक तपशील भरूनही प्रवेशपत्र डाऊनलोड झाली नसल्याने हवालदिल झाले. देशभरातून एनटीएने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर परीक्षार्थी संपर्क साधत होते. अखेर सर्व्हरची अडचण दूर केली जाईल, असे यंत्रणेने ऑनलाईन जाहीर केले आहे.

परीक्षा शुल्क परताव्यासाठी दुरुस्ती विंडो
नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने एनटीएने ३ मे २०२६ ला झालेली परीक्षा पुन्हा २१ जूनला घेण्याचा निर्णय घेतला. पूर्वी दिलेल्या परीक्षेचे शुल्क परताव्याचा निर्णय झाला. त्यासाठी नोंदणी पोर्टलद्वारे परीक्षार्थींना बँक खात्याचे तपशील भरण्याची संधी दिली होती. मात्र छाननीत अवैध खाते आणि इतर चुकीचा तपशील आढळून आला. त्यामुळे पुन्हा बँक खात्याचे तपशील पडताळून दुरुस्त करून शुल्क परताव्यासाठी बँक खाते पुनर्सत्यापन, दुरुस्ती विंडो एनटीएन सुरू करणार आहे. नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी मिळाल्यानंतरच या सुविधेत प्रवेश मिळणार आहे.

काहींची परीक्षा केंद्रे बदलली
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने सर्वच ठिकाणच्या परीक्षा देण्यासाठी जिल्हा तोच ठेवला आहे. यापूर्वी ३ जूनच्या परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींना मिळालेले परीक्षा केंद्र बदलले आहे. काहींना शहराबाहेरील कॉलेजमधील केंद्रे मिळाली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31
Video thumbnail
Pandharpur Accident|पंढरपूर-म्हसवड महामार्गावर भीषण दुर्घटना;पिकअप विहिरीत कोसळून14 भाविकांचा मृत्यू
01:45
Video thumbnail
Nagesh Ashtikar ON Opration Tiger|आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबतच - नागेश आष्टीकर #marathilivenews
02:34
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17

Latest news