चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?

मुंबई : लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल केस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. अशा शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यामागे सामाजिक अँगल तपासला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचवेळी नसरापूर प्रकरणात न्यायालयाने जलदगतीने तपास पूर्ण केला असून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.

पुण्यातील लोहगड केसमध्ये केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. लोहगड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरच्या मुलांमध्ये अशी सूडबुद्धी का तयार होते? यामागे गुन्हेगारीसोबतच सामाजिक अँगल तपासला गेला पाहिजे.

नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंड होणार
नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या २९ जून रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नसरापूर प्रकरण हे दुर्मिळ प्रकरण असून दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, ती न्यायालय मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. न्यायालयाने सुटीच्या काळातही ही केस सुरू चालवली आणि विक्रमी वेळेत निकाल दिला. या केसमुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यामध्ये जलदगतीने शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17

Latest news