राज्यात ‘एफडीए’चे महिनाभरात ९०४ छापे

मुंबई : महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम राबवत ९०४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये ३४ कोटी ६६ लाख ९० हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे. ३२२ आस्थापना सील करून ४२ वाहने जप्त करण्यात आली अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुकाराम मुंढे म्हणाले, २५ मे ते २४ जून २०२६ या कालावधीत मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात या कारवाया करण्यात आल्या. प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विरोधातील मोहिमेत ४४६ आस्थापनांवर छापे टाकून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये ४५७ आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर कारवाई करत एफडीएने ४४० आस्थापनांची तपासणी केली. आंबे, बाटलीबंद पाणी, खवा, बेकरी पदार्थ, मसाले, खाद्यतेल, तूप, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट यांसह विविध खाद्यपदार्थांचा २९ कोटी ११ लाख रुपयांचा आणि २२ लाख किलोहून अधिक साठा जप्त करण्यात आला असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

औषध विभागानेही मोठी कारवाई करत एका महिन्यात ५५ धाडी टाकल्या. औषधे, वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवर एकूण ५ कोटी ५२ लाख रुपयांची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दिशाभूल करणा-या औषध जाहिरातींवर ३१ कारवाया करण्यात आल्या, तर ९५ प्रकारच्या २९७ उत्पादनांवर नियामक कारवाई झाली असे मुंढे म्हणाले. पुणे मद्य विषबाधा प्रकरणाच्या तपासात भिवंडीतील पुरवठादाराकडून ५९२९ किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले. तसेच मुंबई, भिवंडी आणि पालघर येथे वैद्यकीय उपकरण नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापनांवर २ कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. एफडीएने बोगस औषध व्यवसाय, बनावट औषधे, एनडीपीएस कायद्यांतर्गत औषधांचा गैरवापर, तसेच परवान्याविना औषध उत्पादन आणि विक्री याविरोधातही कठोर पावले उचलली. ९ एफआयआर दाखल करण्यात आले असून २ आरोपींना अटक करण्यात आली, असेही मुंढे यांनी सांगितले.

नागरिकांना दर्जेदार उत्पादने देण्याला प्राधान्य
महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि कायदेशीर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची कठोर अंमलबजावणी सुरू राहील. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणा-या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21

Latest news