ऑपरेशन टायगर ३.० सुरू

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर ३.० ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता १४ पेक्षा जास्त आमदारही आमच्यासोबत येतील, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ऑपरेशन टायगर ३.० सुरू झाले आहे. थोडे थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वत: आदित्य ठाकरे यांनीही म्हटले आहे. जेव्हा शिंदे दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होते.

शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी
गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ऑपरेशन ३.० ला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा ते दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होते. हे खुद्द उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही कबूल केले आहे. या शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या दौ-यावर खोचक टोला
फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौ-याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे; मुलाने (आदित्य ठाकरेंनी) काम केले नाही, तर बापाने ते केलेच पाहिजे.

संजय दिना पाटलांना सल्ला
पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिला आहे. पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ करणे चुकीचे आहे. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी सॉरी म्हणायला काहीच हरकत नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17

Latest news