पतीच्या निधनाचा धक्का अस ; पत्नीनेही सोडले प्राण

देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यातील विजयनगर (गौंडगाव) येथे पती-पत्नीच्या अतूट प्रेमाची आणि आयुष्यभराच्या सहजीवनाची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. अल्पशा आजाराने शिवराज नागशेट्टी बिराजदार (वय ६०) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पत्नी सिकंदराबाई शिवराज बिराजदार (वय ५४) यांना अस झाली. पतीच्या वियोगाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि काही वेळातच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला एकाच घरातून पती-पत्नीच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेमुळे विजयनगर (गौंडगाव) परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर आयुष्यभर सुख-दु:खात एकमेकांची साथ देणा-या या दाम्पत्याने मृत्यूनंतरही एकमेकांची साथ न सोडल्याची भावना व्यक्त करीत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शिवराज बिराजदार हे शांत, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. तर सिकंदराबाई या प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि पतीप्रती अपार जिव्हाळा असलेल्या गृहिणी होत्या. पतीच्या निधनाचा धक्का त्यांना इतका अस झाला की त्यांनीही या जगाचा निरोप घेतला. वलांडीचे सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील यांच्या त्या आत्या मामा होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी तसेच नातवंडे, असा मोठा आप्तपरिवार परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, अंत्यदर्शनासाठी आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्यावर स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने ‘खरे सहजीवन म्हणजे आयुष्यभराची साथ’ या भावनेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, बिराजदार कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news