फ्रीजमध्ये प्रकटले ‘बर्फाचे शिवलिंग’

आग्रा : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सध्या एका घरातील फ्रीज आस्थेचं मोठे केंद्र बनला आहे. फ्रीजरच्या आत जमलेल्या बर्फाच्या आकृतीला स्थानिक लोक शिवलिंगाचे रूप मानत आहेत. पहिल्या दिवशी केवळ आसपासच्या लोकांची गर्दी झाली होती, परंतु आता दुस-या दिवशी शेजारच्या गावातील लोकही आले. इतर भागांतूनही मोठ्या संख्येने महिला या घरी येऊन पूजा-अर्चा करत आहेत. संपूर्ण परिसरात ‘हर-हर महादेव’आणि ‘बम-बम भोले’चा जयघोष पाहायला मिळत आहे.

बाबा अमरनाथ यांच्या बर्फानी शिवलिंग चर्चांदरम्यानच समोर आलेल्या या घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. अर्थात या घटनेबाबत आस्था आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून चर्चा सुरू आहे. नगला भोजा येथे राहणा-या या कुटुंबाच्या घरी दुस-या दिवशी सकाळपासूनच महिलांची ये-जा सुरू झाली. घराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. महिला हातात पूजेचे ताट, बेलपत्र, फूल, फळे आणि प्रसाद घेऊन पोहोचल्या आहेत. अनेक महिलांनी बर्फाच्या या आकृतीसमोर हात जोडून कुटुंबाच्या सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.

दिवसभर भाविकांची ये-जा सुरू
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीजच्या फ्रीजरमध्ये जमलेल्या बर्फाने असा आकार घेतला, जो दिसायला हुबेहूब शिवलिंगासारखा वाटतो. जेव्हा घरातील लोकांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांनी याची माहिती शेजा-यांना दिली. हळूहळू ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली आणि लोक दर्शनासाठी येऊ लागले. आता परिस्थिती अशी आहे की, दिवसभर भाविकांची ये-जा सुरू असते. घराच्या आत ज्या ठिकाणी फ्रीज ठेवला आहे, तिथेच लोक श्रद्धेने पूजा करत आहेत. दुस-या दिवशी पूजेचं स्वरूप अधिकच व्यापक पाहायला मिळालं. घरातील वातावरण पूर्णपणे भक्तीमय झालं. ‘हर-हर महादेव’ आणि ‘बम-बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news