16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवालांचे ईडीच्या संचालकांना पत्र; समन्स रद्द करण्याची मागणी

केजरीवालांचे ईडीच्या संचालकांना पत्र; समन्स रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नोटिसीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांना पत्र लिहिले असून त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, ईडीने पाठवलेले समन्स स्पष्ट नाही. त्यांना प्रत्यक्षदर्शी किंवा संशयित म्हणून बोलावले जात आहे, हे यात स्पष्ट नाही. भाजपचे नेते मला ३० ऑक्टोबरपासूनच समन्स बजावून अटक करू, असे सांगू लागले होते आणि संध्याकाळपर्यंत मला समन्स मिळाले. हे समन्स भाजपच्या नेत्यांमध्ये लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींवर विचार करून समन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी ईडीला केली आहे.

केजरीवाल म्हणाले की, देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि त्यांना निवडणूक प्रचारासाठी जायचे आहे. आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय संयोजक आणि स्टार प्रचारक या नात्याने मला निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवास करावा लागतो आणि ‘आप’च्या प्रादेशिक कार्यकर्त्यांना राजकीय मार्गदर्शन करावे लागते. दिल्लीचा मुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडे राज्यकारभार आणि अधिकृतता आहे. “अशा काही वचनबद्धता आहेत ज्यासाठी माझी उपस्थिती आवश्यक आहे, असे ते म्हणाले. दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.

बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कथित मद्य घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचे समन्सवर बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. मला राज्यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेता येणार नाही, यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR