32.1 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीय'आप'चे शुक्रवारपासून जनमतसंग्रह

‘आप’चे शुक्रवारपासून जनमतसंग्रह

नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार शुक्रवार, १ डिसेंबरपासून एक मोहीम (मी पण केजरीवाल) सुरू करणार आहे. या मोहिमेद्वारे पक्षाने दिल्लीतील लोकांमध्ये जनमतसंग्रह करण्याची औपचारिक घोषणा केली आहे. आप पक्ष ”मी पण केजरीवाल” (मैं भी केजरीवाल) नावाची मोहीम चालवेल, ज्याद्वारे जनतेला विचारले जाईल की, “अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेचा पहिला टप्पा १ ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ ते २४ डिसेंबर दरम्यान जनसंवाद होणार आहे.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने केजरीवालांना २ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आणि नोटीस मागे घेण्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल आणि संपूर्ण आम आदमी पक्षाचा असा विश्वास आहे की, ईडी आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू इच्छित आहे, त्यामुळे ईडी नक्कीच उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांना अटक करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR