नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी सध्या कमी होताना दिसत नाहीत. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोवा न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले. अरविंद केजरीवाल यांना २९ नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आम आदमी पक्षाने म्हटले आहे की त्यांना या प्रकरणात समन्स प्राप्त झाले आहे, परंतु त्यात मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या गुन्हेगारी खटल्याचा तपशील नाही. आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर म्हणाले की, केजरीवाल यांना न्यायालयात हजर होण्याच्या एक दिवस आधी समन्स प्राप्त झाले आहे. पालेकर हे केजरीवाल यांचे वकीलही आहेत. आम्ही कागदपत्रे घेऊ, त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की नाही याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले