नांदेड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आयटीआय चौकात बुधवारी सकाळी झालेल्या आंदोलनात, संबधितांनी माफी मागावी अन्यथा नांदेडसह राज्यात फिरू देणार नाही असा इशारा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादीच्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांना नांदेडमध्ये अथवा राज्यामध्ये फिरू देणार नाही. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर नेत्यांनी अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नांदेड महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, सुनील नानवटे, मोहम्मद खान पठाण, शिरीष गोरठेकर, मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास गोरठेकर,उत्तमराव सोनकांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई जोगदंड,डॉ. मीनाक्षी कागडे,अॅड.एजाज,युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे,लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी,धमार्बाद तालुकाध्यक्ष दीपक पाटील कदम,बाबुराव पाटील कदम,नारायण पाटील पवार, देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार,देगलूर शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार,नगरसेवक स्वप्निल लुंगारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















