लातूर : प्रतिनिधी
रॉयल एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (कॉक्सिट), लातूर येथील विद्यार्थ्यांनी विविध आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. ई. यू. मासूमदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये क्रिकेटमध्ये कोयले रमन, जाधव दत्ता, शेख सुफियान आणि मस्के निकिता यांनी सहभाग नोंदविला. बास्केटबॉल स्पर्धेसाठी बेंबडे ओम, देवडे प्रणव, गणेश निंमट, करण भोसले आणि मठपती श्रेयश यांची निवड झाली होती. योगा स्पर्धेत बाबळसुरे संस्कृती हिने उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले. बॉक्सिंगमध्ये केळकर दीपक, पॉवरलिफ्टिंगमध्ये गोणे स्वाती व जाधव गौरव, बुद्धिबळ स्पर्धेत इंगळे प्रथमश, वेटलिफ्टिंगमध्ये तांबोळकर प्रिया तसेच अॅथलेटिक्स स्पर्धेत जाधव वैष्णवी आणि उटगे वैष्णवी यांनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
















