लातूर : प्रतिनिधी
आजचे विद्यार्थी हेच उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. जेएसपीएम संस्था व महाविद्यालयात गुणवत्तेवर भर दिल्याने याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून सीईटी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून वैद्यकीय व अभियांत्रिकी बरोबरच प्रशासकीय सेवेत जाण्याचे मार्गदर्शन व संधी विद्यार्थ्यांना यातूनच मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा असून विविध कौशल्य विकसित करुन मुल्य जोपासत ध्येय गाठावे, असे प्रतिपादन प्राचार्य हरिदास फेरे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, लातूर या महाविद्यालयात विस्तारित सीईटी सेल व एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर तर उद्घाटक सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले, प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्राचार्य हरिदास फेरे, समन्वयक प्रा. विनोद जाधव, समन्वयक प्रा. अनिरुद्ध पाटील, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य विकास लबडे उपस्थित होते.
यावेळी कव्हेकर म्हणाले की, आजच्या बदलत्या काळात आज घेतलेली पदवी उद्या कालबा होत आहे, दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञानाच्या शोधात राहावे. महाविद्यालयात जे ज्ञान मिळतय त्यांचा सद्उपयोग करुन घ्यावा प्रसंगी येणाया आव्हानांवर मात करुन भविष्य घडवावे. यशस्वी विद्यार्थी तोच सतत अभ्यास चिकाटी, जिद्द व ध्येय उराशी बाळगून जगतो तोच जगात टिकतो असेही याप्रसंगी म्हणाले तसेच संस्थेत इस्कॉन व श्री श्री रविशंकर महाराज यांच्याशी करार करुन मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यावर भर आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सीईटी सेलच्या माध्यमातून विद्यार्थी यशस्वी होतील. याप्रसंगी प्रास्ताविकात प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी महाविद्यालयात नीट, जेईई, सीईटी व एमपीएससी फाऊंडेशन स्पर्धा परीक्षेच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन यशवंत व यशस्वी विद्यार्थी निर्माण करणार असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सुचिता घाडगे व रमाकांत शिंदे यांनी केले. आभार प्राचार्य विकास लबडे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य विठ्ठल चेवले, उपप्राचार्य मनोज गायकवाड, उपप्राचार्य संजय अंकुश, प्रा. हनमंत बद्दे,प्रा. निवृत्ती गौंडगावे, प्रा. वैजनाथ जाधव, प्रा. सुधाकर दर्शने, प्रा. अंजली आकुसकर प्रा. परमेश्वर भंगे,प्रा. विरेश स्वामी प्रा. उद्धव शेळके प्रा. दिपक गोरे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
















