लोटस स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना; ४ पीडित महिलांची सुटका

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील आनंदनगर रोड, विद्युतनगर चौक परिसरातील लोटस स्पा सेंटर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली कथितरीत्या सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा नांदेड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने पदार्फाश केला. या कारवाईत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, गौरव राजकुमार सरपाते (व्यवसाय व्यापार, रा. राहुलनगर, हनुमानगड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला आनंदनगर रोडवरील लोटस स्पा सेंटर मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर बोगस ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खात्री करण्यात आली. ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता पोलिसांनी आनंदनगर रोडवरील लोटस स्पा सेंटर येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान ४ पीडित महिला आढळून आल्या. त्यामध्ये महाराष्ट्रासह आसाम राज्यातील महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. महिलांची चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली असून, त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.

कारवाईपूर्वी बोगस ग्राहकाला लोटस स्पा सेंटर येथे पाठविण्यात आले होते. पंचांसमक्ष त्याच्याकडे पैसे देण्यात आले आणि ठराविक संकेत मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.छाप्या दरम्यान पंचांसमक्ष रोख ४ हजार रुपये जप्त करण्यात आले. यामध्ये बोगस ग्राहकास देण्यात आलेल्या ५०० रुपयांच्या ८ नोटांचा समावेश आहे. तसेच आरोपी गौरव सरपटे याच्या ताब्यातून १ मोबाईल (५० हजार रुपये) असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मधुकर टोनगे, रितेश कुलथे, गणेश लोसरवार, कवठेकर यांनी कारवाई केली. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, केंद्रे, दिपा कठारे आणि महिला सहाय्य कक्षातील महिला अंमलदार कांचन शिंदे व देवकी पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news