नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह तीन वर्षांपासून बंद

परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेले स्वतंत्र नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यान्वित झाले नसल्याचा आरोप जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या परभणी जिल्हा समितीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक निधीच्या वापराचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत जन आरोग्य अभियानाचे जिल्हा निमंत्रक तथा राज्य समन्वय समिती सदस्य सचिन देशपांडे यांनी आरोग्यमंत्र्यांना जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्हा रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हस्तांतरण सुरू असतानाच स्वतंत्र नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले. मात्र, या प्रकल्पाच्या नियोजनात रुग्णहित, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ तसेच भविष्यातील प्रशासकीय बदलांचा पुरेसा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासनाचा मोठा निधी खर्च करून सुविधा उभारण्यात आली असली तरी ती प्रत्यक्षात वापरात आलेली नसून आजपर्यंत तेथे एकही नेत्र शस्त्रक्रिया झालेली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पाचा पूर्णत्व अहवाल आणि आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात निधी मंजुरीपासून बांधकाम, उपकरण खरेदी, देयके आणि अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास १० ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीसमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या परभणी जिल्हा समितीने दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news